आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलांना विहिरीत ढकलून केला अपहरणाचा बनाव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना -तालुक्यातील पाहेगाव येथे घरात झोपलेल्या दोन बालकांच्या अपहरणाचा बनाव करणाºया छायाबाई तळेकरनेच आपल्या 2 वर्षीय मुलाचा व 4 वर्षीय मुलीचा विहिरीत ढकलून खून केल्याचे तपासात उघड झाले आहे.
याप्रकरणी छायाबाईसह तिचा पती, सासरे अशा पाच जणांना अटक केली आहे. सोमवारी रात्री हा प्रकार घडल्यानंतर मृत मुलांची आई छायाबाईनेच मंगळवारी सेवली पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून मुलगा व मुलीचे अपहरण केल्याचे तक्रारीत म्हटले होते. परंतु पोलिस तपासात छायाबाईनेच हा खून केल्याची कबुली दिली. घरातील लोकांच्या छळाला कंटाळून आपण कुणाल व अश्विनी या दोन मुलांना विहिरीत ढकलल्याचे तिने सांगितले.