आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

एकनाथ आव्हाड यांचे निधन, अाज अंत्यसंस्कार, वाचा अल्पपरिचय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
माजलगाव - दलित चळवळीचे लढवय्ये नेते व मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष अॅड.एकनाथ आव्हाड यांचे सोमवारी सकाळी हैदराबादेत खासगी रुग्णालयात निधन झाले. अल्सरवरील उपचारासाठी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर शस्त्रक्रियाही झाली होती. परंतु त्यांची प्रकृती सुधारली नाही. त्यांच्या पार्थिवावर तेलगाव येथे मानवी हक्क अभियान कार्यालय परिसरात मंगळवारी सकाळी ९ वाजता अंत्यसंस्कार होतील.
अल्पपरिचय
पोतराज ते मानवी हक्क अभियानाचे अध्यक्ष
बीड जिल्ह्यातील दुकडेगाव (ता. वडवणी) येथे १९ जानेवारी १९५६ मध्ये जन्मलेल्या अॅड. एकनाथ आव्हाड यांनी अस्पृश्यता आणि जातिभेदाच्या विरोधात गावोगावी संघर्ष केला. हजारो भूमिहीनांना गायरान जमिनी मिळवून दिल्या. त्यांना सेंद्रिय शेती शिकवली. बचत गट स्थापन करून छोटे, मोठे व्यवसाय करायचा मंत्र दिला. स्वत: पोतराज असताना पोतराजाचे काम झुगारून स्वत:ला शैक्षणिक चळवळीत वाहून घेतले. लवुळच्या गजानन विद्यालयात त्यांचे शालेय शिक्षण पूर्ण केले. माजलगाव येथे महाविद्यालयीन शिक्षण घेतल्यांनतर अंबाजोगाई येथील एसआरटी कॉलेजमधून त्यांनी राज्यशास्त्रात एम. ए. केले. पुढे नगरच्या सीएसआरडी कॉलेजमध्ये एमएसडब्ल्यू पूर्ण केले. बीडच्या विधी महाविद्यालयातून पदवी मिळवली. १९९० मध्ये समविचारी मित्रांना सोबत घेऊन मानवी हक्क अभियान या संघटनेची स्थापना करत अध्यक्ष बनले. सामाजिक वेठबिगारी, रोजगार, यासाठी मोर्चे काढून आंदोलने केली. १९९५ ते २०१२ मध्ये सत्यशोधक पद्धतीने सामुदायिक विवाह सोहळ्याची सुरुवात केली. २००१ मध्ये कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांच्या जन्मशताब्दीनिमित्त मराठवाड्यातील संस्था, संघटना, व्यक्ती यांना साेबत घेऊन जमीन अधिकार आंदोलन या संघटनेची सुरुवात केली. या माध्यमातून आठ जिल्ह्यांतील २५०० गावांमधील भूमिहीन दलित गायरानधारकांकडे असलेले सर्व पुरावे जमा करून पन्नास हजार कुटुंबांचे मालकी हक्काचे प्रस्ताव दाखल केले. त्यांना जमिनी मिळवून दिल्या. त्यांनी २००६ मध्ये आपल्या हजारो अनुयायांसह नागपूरमध्ये बौद्ध धर्म स्वीकारला होता.
बातम्या आणखी आहेत...