आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड: नागझरीच्या शेतकऱ्याची कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नेकनूर- कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे बीड तालुक्यातील नागझरी येथील शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी अकरा वाजता घडली. भास्कर विठ्ठल येळवे (५८) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. 
 
नागझरी येथील भास्कर येळवे यांना ४ एकर शेती असून नापिकीमुळे मागील तीन वर्षांपासून ते निराश होते. त्यांच्याकडे  खासगी सावकरासह जिल्हा मध्यवर्ती बँकेचे  अडीच लाख रुपये कर्ज होते. हे कर्ज फेडायचे या चिंतेतून शेतातील  झाडाला दोरीने गळफास घेऊन  त्यांनी आत्महत्या केली. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी व पत्नी असा परिवार आहे. नेकनूर पोलिसांनी पंचनामा केला आहे.
बातम्या आणखी आहेत...