आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यात कर्जबाजारी शेतक-याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्ह्यात शेतकरी आत्महत्येचे सत्र सुरूच असून कर्ज व नापिकीने धास्तावून गुरुवारी निलंगा तालुक्यातील शेतक-याने विष घेतले. येथील शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. संग्राम सखाराम कारीकंटे (४२) असे त्यांचे नाव असून जिल्ह्यातील या वर्षातील ही ३८ वी शेतकरी आत्महत्या ठरली आहे.

संग्राम यांना दोन एकर १५ गुंठे कोरडवाहू जमीन आहे. त्यांनी शेतात बोअर घेतले होते, परंतु त्याला पुरेसे पाणी नव्हते. खरिपात नापिकी झाली होती. त्यांनी विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे पाच हजारांचे कर्ज उचलले होते. यापूर्वी चारपैकी तीन मुलींची लग्ने केल्याने त्यांच्यावर खासगी कर्जाचाही बोजा झाला होता. शिवाय एका मुलीच्या लग्नाची, पत्नीची तसेच दोन मुलांच्या शिक्षणाची काळजी त्यांना लागली होती. हाती पैसा नसल्याने ते अस्वस्थ होते. कर्ज कसे फिटेल, मुलांचे शिक्षण व मुलीच्या लग्नाची चिंता कशी मिटेल या प्रश्नांनी त्यांच्या जिवाची घालमेल होत होती. या विवंचनेतच त्यांनी गुरुवारी कीटकनाशक घेतले. उपचारार्थ त्यांना तत्काळ लातूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.