आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

दांपत्याची गळफास घेऊन आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अजिंठा - शेतीकामासाठी गेलेल्या पती-पत्नीने शेतात असलेल्या वखारीतील लोखंडी पाइपला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथे सोमवारी उघडकीस आली. या जोडप्याला दोन वर्षांचा एक मुलगा आहे. आत्महत्येचे कारण समजू शकले नाही.

सिल्लोड तालुक्यातील पिंपळदरी येथील गजानन बाबूराव कळात्रे (30) व पत्नी कल्पना (25) हे दोघे सोमवारी शेतात काम करण्यासाठी गेले होते. मात्र, सायंकाळी ते घरी परतले नाहीत. त्यामुळे नातेवाईक व ग्रामस्थांनी त्यांचा शोध घेतला. शेतात असलेल्या वखारीतील लोखंडी पाइपाला बांधलेल्या दोरीला गजानन लटकल्याचे आढळून आले, तर शेजारीच त्याची पत्नी कल्पना मृतावस्थेत आढळून आली.

माहिती मिळताच पोलिस उपविभागीय अधिकारी राम मांडुरके, सहायक पोलिस निरीक्षक दिनेश आहेर, फौजदार सुभाष कानोडजे, पोलिस हेडकॉन्स्टेबल आर. एन. छत्रे, किशोर काळवणे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.