आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सांभाळायची एेपत नसल्याने शेतकऱ्याचे गाेदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - ‘जनावरे जगवायची अाता ताकदच नाही, मी जनावरे नेऊन काय करू? दारात अशा मरण्यापेक्षा संगाेपन करणाऱ्यांना गाई दिल्या’ अशी भावना व्यक्त करत बीड तालुक्यातील इट येथील गंगाराम गवळी यांनी व्यथा मांडली. दुष्काळात शासनाने सुरू केलेल्या छावण्यात सहा महिन्यांपासून जगलेली जनावरे प्रशासनाच्या छावणी बंदच्या निर्णयानंतर जड अंत:करणाने एका शेतकऱ्याने बारा गाईंचे दान केले. दुष्काळी स्थिती व संगाेपनाची क्षमता नसल्यामुळे निर्माण झालेली शेतकऱ्याची विदारकता पुन्हा एकदा समोर आली अाहे.

बीड तालुक्यातील इट येथील गंगाराम गवळी यांच्याकडे १२ गाई अाणि एक वळू हाेता. मागील वर्षी पाऊस नसल्याने दुष्काळाला सामाेरे जावे लागले. शासनाने उपाय म्हणून छावण्या सुरू केल्या. परंतु छावण्यांमध्ये थांबले तर कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा ही विवंचना हाेती. बीड तालुक्यातील मैंदा येथे संत किसनबाबा सेवाभावी संस्थेच्या छावणी चालकांनी पशुधन सांभाळण्याची हमी दिल्याने गंगाराम यांनी जनावरे तेथे नेण्याचा निर्णय घेतला. दुष्काळाचे संकट झेलत असतानाच छावणीत नेताना दाेन गाई चाऱ्याअभावी दगावल्या. खाण्यास काही नसल्याने ही जनावरे कुपाेषित हाेती.

छावणीत एका गाईने वासराला जन्म दिला तेही कुपाेषित हाेते. छावणीजवळच्या हाॅटेलमालकाने पालन पाेषण केले. मृत हाेण्याअाधी वासराला वाचविण्यात यशही अाले. सहा महिने या जनावरांना चारा- पाणी मिळाल्याने अाधार झाला हाेता. १० जून राेजी अचानक छावणी बंदचे अादेश धडकले. शेतकरी त्यांची जनावरे घरी नेत हाेते. त्यावेळी ही जनावरे छावणीतच उघड्यावर हाेती.

नुकसान झाले तरी अडचणीत छावणी चालवली
नाेव्हेंबरपासून सुरू झालेल्या मैंदा येथील किसनबाबा संस्थेच्या छावणीत एक हजार जनावरे हाेती. तीन वेळा वारे, वादळामुळे नुकसान झाले. चिखली येथून सहा हजार रुपये टन दराने मका, अमरावती येथून कुट्टी अाणल्याचे छावणीचे संचालक विठ्ठल नाना शिंदे म्हणाले.
बातम्या आणखी आहेत...