आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी पुत्रांनी उपोषण सोडले, आता व्यापक अांदोलन उभारण्याचा निर्धार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना: भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी अन्नत्याग आंदोलन करणाऱ्या शेतकरी पुत्रांनी शनिवारी रात्री आपले अन्नत्याग आंदोलन मागे घेतले. पोलिसांनी त्याच अटीवर आमची सुटका केल्याने आंदाेलन मागे घ्यावे लागले. मात्र आता अधिक व्यापक आंदोलन उभारणार असल्याचे या युवकांनी सांगितले.

शुक्रवारपासून या युवकंानी भाजप प्रदेशाध्यक्ष दानवे यांच्या भोकरदन येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन सुरू केले होते. त्यानंतर पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई करून त्यांना सदर बाजार पोलिस ठाण्याच्या कोठडीत ठेवले होते. दरम्यान, शनिवारी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास अन्नत्याग आंदोलन मागे घेण्याच्या अटीवर पोलिसांनी त्यांची सुटका केली. त्यानंतर या युवकांनी थेट औरंगाबाद गाठले. पोलिसांमुळे आपल्याला उपोषण सोडावे लागल्याचे हनुमंत पवार या युवकाने सांगितले. मात्र हे अांदोलन थांबले नसून दानवे यांचा राजीनामा घेईपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार असल्याचे पवार म्हणाले. या आंदोलनाच्या माध्यमातून सोशल मीडियावर आमच्याशी जोडल्या गेलेल्या युवकांच्या मदतीने पुढील काळात व्यापक आंदोलन उभे केले जाणार आहे. औरंगाबाद येथील डाव्या विचारांच्या संघटनांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला असल्याचे या युवकांनी सांगितले. या आंदोलनादरम्यान पोलिसांनी कशी दडपशाही केल्याचे या युवकांनी सांगितले. दरम्यान, सोमवारी औरंगाबाद येथेच आंदोलनाची पुढील दिशा ठरवली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...