आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लग्नाच्या चिंतेने शेतकऱ्याच्या तरुण मुलीची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - वाघलगाव (ता. सोनपेठ) येथील शेतकऱ्याच्या तरुण मुलीने बेताच्या परिस्थितीने व लग्नाच्या चिंतेने आठ दिवसांपूर्वी विष प्राशन केले हाेते. शुक्रवारी नववर्षाच्या पहिल्या दिवशी (दि.एक) तिचा मृत्यू झाला. तरुणीच्या आत्महत्येने गावात हळहळ व्यक्त होत होती. शारदा माणिक शिंदे (२१) असे या तरुणीचे नाव आहे.

माणिक शिंदे हे अल्प भूधारक शेतकरी आहेत. त्यांना वाघलगाव येथे साडेतीन एकर जमीन आहे. गेल्या तीन वर्षांपासून आलेल्या नैसर्गिक आपत्तीमुळे शिंदे यांना कुठलेही उत्पन्न झाले नव्हते. त्यांना चार मुली असून दोघींचे लग्न झालेले आहे. दोन मुली लग्नाच्या होत्या.

रोज रात्री घरात होणाऱ्या लग्नाच्या विषयामुळे शारदा ही चिंताग्रस्त झाली होती. शारदा ही सोनपेठ येथील राजीव गांधी महाविद्यालयात संगणक शास्त्राच्या दुसऱ्या वर्गात शिकत होती. परिवाराला मदत करण्यासाठी शारदा ही सोनपेठ येथील व्हीजन इंग्लिश स्कूल या शाळेत पार्टटाइम नोकरी करत होती. दुष्काळात वडील आपल्या लग्नाच्या चिंतेने नैराश्यग्रस्त झाल्याने आपण स्वतः जीव देऊन वडिलांना या चिंतेतून सोडवावे या उद्देशाने शारदा हिने आठ दिवसांपूर्वी २५ डिसेंबर रोजी वाघलगाव येथील आपल्या राहत्या घरी विष प्राशन केले. तिला परळी येथील रुग्णालयात दाखल केले होते. शुक्रवारी तिचा मृत्यू झाला.