आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्जासाठी शेतकरी मारताहेत बँकेत चकरा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजिंठा- दीडमहिन्यात फक्त सहाशे शेतकऱ्यांनाच कर्ज वाटप झाले आहे. परंतु अद्यापही हजार ८०० शेतकरी कर्ज मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. त्यासाठी दीड महिन्यापासून शेतकरी अजिंठा येथील स्टेट बँक आॅफ हैदराबादमध्ये चकरा मारत आहेत. बँक मॅनेजर शेतकऱ्यांना कर्जवाटपासाठी दिवसातील दोनच तास देत असल्याने खेड्यापाड्यातून येणाऱ्या काही शेतकर्‍यांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. या भागातील मागील तीन ते चार वर्षांपासून अस्मानी संकटाचा शेतकरी सामना करत आहेत. त्यामुळे यंदा शेती पिकवण्यासाठी जवळ कवडीही नसल्याने अजिंठा परिसरातील शेतकरी बँकांचे दरवाजे ठोठावत आहेत. शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्यात यावे, ज्या बँका कर्ज देणार नाहीत, अशा बँकांवर गुन्हे दाखल करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश आहेत. परंतु मुख्यमंत्र्यांच्या आदेशाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येत आहे.

अजिंठा येथील बँकेकडून दोन महिने संपत आले तरी शेतकऱ्यांना कर्जासाठी तारीखवर तारीख दिली जात आहे. येथील महंमद युसूफ सौदागर हे शेतकरी अजिंठ्याचे रहिवासी असून कर्ज मिळवण्यासाठी दीड महिन्यापासून बँकेत चकरा मारत आहेत. त्यांच्यासारखीच शेकडो शेतकऱ्यांची अवस्था आहे. दिवसभरात ३० शेतकऱ्यांचा कर्जासाठी नंबर लागत असल्याने अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे.
कुपन सिस्टिम सुरूच
शेतकरीबँकेत कर्जासाठी गर्दी करत आहेत. मात्र, कुपन देऊन कुणाला एक आठवडा, कुणाला दोन अशा तारखा देत असल्याने ही बँक आहे की न्यायालय, असा संतप्त सवाल शेतकरी करत आहेत.
माझ्याकडे वेळ नाही, नंतर सांगतो
"माझ्याकडेवेळ नाही. नंतर सांगतो' असे सांगून बँक मॅनेजर एम. के. कुलकर्णी यांनी माहिती देण्यास टाळले. दीड महिन्यात सहाशे शेतकऱ्यांना जवळपास सहा कोटींचे कर्ज वाटप केले गेले. मात्र, बँक मॅनेजरने शेतकऱ्यांसाठी दिवसातले दोनच तास िदल्याने सरासरी २,४०० पैकी रोज १४ शेतकऱ्यांचीच कर्जवाटपाची प्रकरणे रोज निकाली निघत आहे, असेही शेतकऱ्यांनी सांगितले. त्यामुळे तासन््तास थांबावे लागत आहे.
कर्ज वाटपाची वेळ वाढवावी
अनाड,मुखपाठ, शिवना, मादणी आदी गावांतील शेतकरी कर्ज मिळावे यासाठी बँकेत चकरा मारत आहेत. मात्र, महिनाभरापासून नंबर लागत नाही. बँकेच्या या संथगती कामामुळे खरीप हंगाम वाया जात असून लवकर कर्ज मिळण्याची शाश्वती नाही. यामुळे बँकवाल्यांनी वेळ वाढवून लवकरात लवकर शेतकऱ्यांचा प्रश्न सोडवावा. प्रभाकरसूर्यवंशी, शेतकरी अजिंठा येथील स्टेट बँक आॅफ हैदराबाद शाखेत शेतकरी कर्जासाठी ताटकळत उभे राहण्यापेक्षा चपला-बुटांची रांग लावत आहेत. छाया: रितेश गुप्ता