आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैलांना छळणाऱ्यांना वेसण, सलग तास जुंपल्यास कारवाई

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- बैलांचा छळ आणि शोषण करून काबाडकष्ट करून घेण्याचे प्रकार यापुढे बैलमालकांना करता येणार नाहीत. बैलाला चाबकाचे फटके मारणे, पुरानीने टोचणे, डागणे, जास्तीचे ओझे लादणे, जमिनीवर कोसळेपर्यंत मारणे, गरजेइतका चारा न टाकणे अशा छळवादाला आता शासनाने वेसण घातली आहे. साखर संचालकांनी कारखान्यांना ऊस वाहतुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बैलांच्या आरोग्यासाठी प्राणी क्रूरता अधिनियमांतील नियमावली पाठविली असून त्यामध्ये सलग ५ तास आणि दिवसभरात ९ तासांपेक्षा अधिक काम करून न घेण्यासह बैलांचा छळ रोखण्यासाठी सूचना केल्या आहेत.

बैलाच्या कामांना मर्यादा नसते. मात्र, आता मर्यादा घालून देण्यात आल्या आहेत. शेतामध्ये पहाटेपासून सायंकाळपर्यंत बैलांना कामाला जंुपले जाते. नांगरणी, कुळवणी,पेरणीसह साहित्य वाहून नेणाऱ्या गाडीसाठी बैलांना १६ ते १८ तास कामाला लावले जाते. कामाने दमल्यानंतर बसलेल्या बैलांना चाबकाने, रूमण्याने, काठीने बेदम मारहाण केली जाते. शेपटी मुरगाळणे, नाक-तोंड दाबणे, वेसण खेचणे, असा छळ होतो. उसतोडीच्या कामावरही बैलांचा शारीरिक छळ करण्यात येतो. मुंबई येथील प्राणीमित्र संघटनेने याबाबत शासनकाडे तक्रार केल्यानंतर राज्याच्या साखर संचालकांनी सर्व कारखान्यांसाठी १० नोव्हेंबररोजी परिपत्रक काढले असून, त्यामध्ये महत्वपूर्ण १२ सूचना करण्यात आल्या आहेत. या नियमांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

याकडे दुर्लक्ष केल्यास ठरणार गंभीर गुन्हा
>३७ अंशांपेक्षा अधिक तापमानात काम नको
> असमान बैलांना कामाला जुंपू नये
> बैल आजारी असल्यास त्यांना विश्रांती द्यावी
> टोकदार काठी, त्रासदायक वाटणारे जू वापरू नये
> भीती वाटणारे प्रयोग करू नयेत
> लाथ मारू नये, जनावरांवर बसू नये
> नोंदणीकृत व्यक्तीकडून वैद्यकीय उपचार घ्यावेत
> सलग पाच तास, दिवसभरात ९ पेक्षा अधिक तास काम नको
> वजन काट्यावर भार संतुलित राहण्यासाठी रबरी मॅट घालावी
> स्वच्छ आणि मुबलक पाणी, निवाऱ्याची सोय करावी
बैल सांभाळणे परवडणार नाही
सकाळी फडात गेल्यानंतर गाडी कारखान्यावर खाली करून येण्यासाठी रात्र होते. १० तासापेक्षा जास्त वेळ लागतो. त्यामुळे रात्रीपर्यंत बैलांना काम असते. पाच तासांची मर्यादा घातल्यानंतर परवडणार नाही. बैल सांभाळणे अवघड होईल.
-विजय जायभाय, ऊसतोड कामगार, वडगाव(शि.)ता.कळंब