आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

शेतकरी नेत्याचा विष घेण्याचा प्रयत्न; माजलगावातील ऊसदर बैठकीतील प्रकार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

माजलगाव- तालुक्यातील ऊस दरासाठी सुरू असलेल्या आंदोलनात कायदा व सुव्यवस्था बिघडू नये, यासाठी मंगळवारी अायाेजित कारखानदार व शेतकरी नेत्यांच्या बैठकीत तोडगा निघाला नाही. त्यामुळे संतापलेले  शेतकरी नेते भाई थावरे यांनी बैठकीतच विष घेऊन अात्महत्येचा प्रयत्न केला. सुदैवाने ताे यशस्वी हाेऊ शकला नाही.


कारखानदार शेतकऱ्यांच्या उसाला कमी दर देत असल्याने थावरे व शिवसेनेचे उद्धव नाईकनवरे यांनी महिनाभरापासून अांदाेलन सुरू केले अाहे. त्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बिघडत जात असल्याने यावर तोडगा काढण्यासाठी मंगळवारी तहसील कार्यालयात बैठक घेण्यात अाली.  उपजिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, औरंगाबाद  प्रादेशिक साखर संघाचे संचालक शेख रशीद व तहसीलदार एन.जी. झंपलवाड उपस्थित हाेते. सुंदरराव सोळंके,  छत्रपती,  जय महेश शुगर या कारखान्याचे पदाधिकारीही उपस्थित हाेते. मात्र, ऊसदराबाबत ताेडगा निघाला नाही. त्यामुळे थावरे यांनी जवळ आणलेली बाटलीतील विष घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र इतरांनी त्यांना वेळीच राेखले.

 

 

बातम्या आणखी आहेत...