आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्कलकोटचे माजी आमदार महादेव पाटील यांचे श्रीशैलम मंदिर परिसरात हृदयविकाराने निधन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अक्कलकोट- राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, माजी आमदार महादेव काशिराया पाटील (६९) यांचे शनिवारी रात्री हृदयविकाराने आंध्र प्रदेशातील श्रीशैलम येथे निधन झाले.

शनिवारी सकाळीच ते अक्कलकोट येथून मित्रांसोबत दिवाळीचे अाैचित्य साधून श्रीशैलम येथे ज्योतिर्लिंग श्री मल्लिकार्जुन दर्शनासाठी गेले होते. सायंकाळी दर्शन आटोपून बाहेर पडत असताना मंदिर परिसरातच हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांचे निधन झाले. पाटील यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर जेऊर येथे रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात अाले. जेऊर (ता. अक्कलकोट) गावचे सरपंच ते दोन वेळा आमदार, पंचायत समितीचे सभापती, उपसभापती, सिद्धेश्वर कारखान्याचे संचालक आणि काशी विश्वेश्वर शिक्षण संस्थेचे संस्थापक अशी विविध पदे भूषवली. खासदार विजयसिंह मोहिते यांचे ते समर्थक होते.
बातम्या आणखी आहेत...