आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Murdered Wife, Then Committed Suicide In Latur Taluka

पत्नीचा खून करून शेतक-याची आत्महत्या, शेती कर्जावरून लातूर तालुक्यातील घटना

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - कर्ज फेडा व शेती सोडवून घ्या, असा सततचा तगादा लावणा-या पत्नीच्या डोक्यात पतीने कु-हाडीचा तुंबा घालून खून केला व त्यानंतर स्वत: गळफास घेऊन आत्महत्या केली. लातूर तालुक्यातील पिंपरी अंबा येथे शुक्रवारी ही घटना घडली. याप्रकरणी गातेगाव पोलिस ठाण्यात मृत पतीविरुद्ध खुनाचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पिंपरी अंबा येथील अनंत देविदास भिसे (४०) यांच्या शेतीवर कर्ज होते. त्यांची पत्नी अनिता (३५) ही सतत कर्ज फेडा, शेती सोडवून घ्या, असा तगादा अनंत यांच्याकडे लावत होती. त्यास कंटाळून अनंत यांनी अनिता यांच्या डोक्यात कुऱ्हाडीचा तुंबा घातला. यात त्या जागीच ठार झाल्या. या घटनेनंतर अनंत यांनी स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली.