आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Namdev Anerao Get Patent For Agriculture Machine

नामदेवने मिळवले 'समझदार श्रीकांत' पाळी यंत्राचे पेटंट

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शेतातपाळी घालण्याबराेबरच इतर छाेटी, परंतु किचकट कामे तसेच अांतर मशागतीसाठी कमी खर्चातील इंधन यंत्र निर्मिती करत तालुक्यातील पिंपळनेर येथील नामदेव राधाकृष्ण अाणेराव यांनी 'समझदार श्रीकांत' नावाने पेटंट प्राप्त केले अाहे. मनाशी दृढनिश्चय केल्यास एक ना एक दिवस त्याची फलश्रुती मिळते याचा प्रत्यय नामदेव यांनी अाणून दिला अाहे.

पंधरा वर्षांपासून फॅब्रीकेशनच्या क्षेत्रात काम करणारे नामदेव अाणेराव यांचा हाच पिढीजात व्यवसाय. यातील तंत्र अाणि मंत्राचे बाळकडू घरीच मिळाले. अाजाेबांपासून इतर वरिष्ठ घरचेच गुरू. ग्रामीण भागात दिवसेंदिवस पशूधन कमी हाेत अाहे. अनेक शेतकऱ्यांकडे शेती अाहे परंतु शेतातील कामांसाठी पर्यायी व्यवस्था करावी लागते.

ज्यांच्याकडे बैल नाही त्यांना तर अतित्रास साेसावा लागताे. तीन एकर पाळी घालण्यासाठी सध्या बाराशे ते दीड हजार रूपये मजुरी खर्च माेजावा लागताे. तर ट्रॅक्टरच्या अाधारे काम अवघड तर कधी खर्चिक ठरते. त्यामुळे बैलाएेवजी इंधनावर चालणारे यंत्र बनवले तर ते फायद्याचे कसे राहील याचा विचार करत नामदेव यांनी चंग बांधला. फॅब्रिकेशनच्या कामातून मिळणाऱ्या माेबदल्यातील दहा-पंधरा टक्के रक्कम या यंत्राच्या साहित्यासाठी खर्च केली.

काय काम करते यंत्र
कापूस लावण्यासाठी रेघाठी अाेढता येते. ज्वारी, बाजरी, खत पेरणी समान मापात करता येते. उन्हाळी खरडा करता येताे. दाेन ते तीन फुटापर्यंत वापरण्यासाठी यात सेटिंग अाहे. अवघ्या ४५० रूपयात चार एकरपर्यंतचे काम करता येते.
शासन, बँकांकडून प्राेत्साहन हवे

पाळीयंत्राच्या कारखान्यासाठी थाेडीफार शेती विकायचा निर्णय घेतला. परंतु याेग्य किंमत मिळेना. भांडवलाअभावी अडचणी अाहेत. सध्या दुष्काळामुळे शेतकरी चाैकशी करतात. फायनान्सची साेय करून द्या असे म्हणतात. परंतु नामदेव हतबल अाहे. प्रयाेगशील व्यक्तींना प्राेत्साहन देण्यासाठी शासनस्तरावर अथवा अार्थिक क्षेत्रात काम करणाऱ्या सामाजिक संस्था, बँकेकडून अाधार मिळाल्यास ग्रामीण उद्याेजकांना प्राेत्साहन मिळेल.

पेटंटसाठी घेतले कष्ट
या यंत्राच्या पेटंटसाठी नामदेव यांना माहिती मिळत नसल्याने निराश हाेते. अखेर काकांच्या मदतीने मुंबईत पेटंट कार्यालयाशी संपर्क केला. निर्मिती वेगळी असेल तरच पेटंटसाठी विचार हाेताे. नामदेव यांनी इतर यंत्राची नक्कल केलेली नसल्याने प्राेजक्टसाेबत सर्च शुल्कासह अाॅगस्टमध्ये पेटंटसाठी अर्ज केला. जवळपास एक लाख रूपये शुल्कापाेटी खर्च झाले. वेळाेवेळी पुरावे, तांत्रिक अाधार, चित्रफिती सादर केल्या. नाेव्हेंबरमध्ये नामदेव यांना पेटंट मिळाले ते पब्लिश झाले.