आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तूर खरेदीचा आदेशच न मिळाल्याने शेतकरी रांगेतच; लातूरमध्येही मनसेचे अनोखे आंदोलन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
 परभणी- मंगळवारी मुख्यमंत्र्यांनी खरेदी केंद्रासमोरील वाहनातील तूर खरेदी केली जाईल, असे जाहीर केले. परंतु प्रत्यक्षात बाजार समित्यांना बुधवार सायंकाळपर्यंत आदेश प्राप्त न झाल्याने तूर खरेदी थांबलेली होती. या प्रकाराने गेल्या १५ दिवसांपासून तुरीसह रांगेत असलेल्या शेतकऱ्यांत तीव्र नाराजी पसरली आहे.  

दरम्यान, तूर खरेदी केंद्रावर वाहनांच्या रांगा लागलेल्या असताना खरेदी केंद्रे बंद करण्याचा शासनाचा प्रकार म्हणजे दडपशाही असल्याचा आरोप करत सरकारने तत्काळ नाफेडमार्फत खरेदी केंद्रे सुरू करून ४८ तासांत खरेदी केलेल्या तुरीचे चुकारे अदा करावेत  या मागणीसाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यकर्त्यांनी बुधवारी (दि.२६) येथील वसमत रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन केले. 
 
लातूरमध्येही मनसेचे अनोखे आंदोलन
लातूर- राज्य शासनाने शेतकऱ्यांची हमी भावाने सुरू केलेली तूर खरेदी शनिवारपासून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. तो शेतकरीविरोधी असल्याचे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने बुधवारी रेणापूर येथे आंदोलन केले. विकली न गेलेली तूर जनावरांना खाऊ घातल्याशिवाय पर्याय नाही, असे सांगत तूर जनावरांना खाऊ घालण्यात आली.  लातूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तूर शिल्लक राहिली आहे. शेतकऱ्यांची तूर खरेदी बंद झाल्यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागणार आहे. व्यापारी देतील त्या भावात तूर विकल्याशिवाय शेतकऱ्यांसमोर पर्याय राहिलेला नाही. 
 
 
बातम्या आणखी आहेत...