आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

रजिस्ट्रीसाठी शेतकऱ्यांची पिळवणूक

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
फुलंब्री - शेतजमीन रजिस्ट्री करण्यासाठी मनमानी रक्कम घेतली जाते. या प्रकरणाला आवर घालावा, नसता कार्यालयासमोर आंदोलन करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने देण्यात आला आहे.

पाथ्री येथील नारायण वाळके पाथ्रीकर या शेतकऱ्याने तीन गुंठे जमीन विक्री केली. यासाठी शासकीय खर्च एक हजार सातशे रुपये असताना या शेतकऱ्याकडून १८ हजार रुपये घेण्यात आले. सहनिबंधक कार्यालयाकडून वारंवार होणाऱ्या या प्रकरणाची दखल घेत संभाजी ब्रिगेडने सहदुय्यम निबंधक (रजिस्टार) यू. बी. वाघमारे यांना निवेदन दिले.
याप्रकरणी वाघमारे यांना विचारले असता ते म्हणाले, रजिस्ट्रीसाठी शासकीय खर्च १७०० रुपये आहे. तो आम्ही घेतला व रीतसर पावती दिली, तर लिखाण करणाऱ्यांनी ५०० रुपये घ्यायला हवे, त्यांनी १८ हजार रुपये घेतले याची माहिती आम्हाला नाही. असे प्रकार आम्हाला निदर्शनास आणून द्यावेत, असेही वाघमारे म्हणाले. या प्रकरणी संभाजी ब्रिगेडने मध्यस्थी करत संबंधित लिखाण करणारे टायपिंग सेंटरचे मालक यांना कार्यालयात बोलावून चौकशी केली असता, हे पैसे नजरचुकीने घेतले गेल्याचे त्यांनी सांगितले. कार्यकर्त्यांनी जाब विचारताच लेखणीसाने पैसे परत केले. यावर सहदुय्यम निबंधक यू. बी. सोनवणे यांनी सांगितले की, ज्यांना रजिस्ट्री करायची त्यांनी किती पैसे लागतील याविषयी कार्यालयात विचारणा करावी, यानंतर लिखाण करून त्याची रक्कम ठरवून घेतली तर शेतकऱ्यांची पिळवणूक होणार नाही, असे सांगितले. या निवेदनावर दगडू बनसोड, महेंद्र पाथ्रीकर, शेख शाकेर, वसंत पाथ्रीकर, कचरू पाथ्रीकर, भास्कर पाथ्रीकर, नारायण वाळके, संजय निंबाळकर, भास्कर बनसोड, काकाजी बनसोड, सिद्धिविनायक चव्हाण, अमोल बनसोड, गणेश सोनवणे यांच्या सह्या आहेत.