आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बँकेसमाेर शेतकर्‍याचे शाेलेस्टाइल आंदाेलन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धारूर - भारतीय स्टेट बँकेकडून पीक कर्ज देण्यात येत नसल्याने तालुक्यातील रेपेवाडी येथील शेतकरी शंभर शेंडगे याने बँकेसमाेर आंब्याच्या झाडावर चढून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. पाेलिसांनी वेळीच लक्ष देऊन शेतकर्‍यांची समजूत काढल्याने पुढील अनर्थ टळला.

शेतकरी शंभर शेंडगे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची आहे. या परिस्थितीमुळे त्यांच्या पत्नीने आत्महत्या केली हाेती. त्यांना एक मुलगा व एक मुलगी असून दाेघांचेही िशक्षण सुरू आहे. त्यांच्या िशक्षणाचा खर्चही पेलवत नाही, शेती अडीच एकर आहे. त्यांनी दाेन वर्षांपूर्वी भारतीय स्टेट बँकेकडून १५ हजार रुपये कर्ज घेतले हाेते. ते फेडणे शक्य झाले नाही, त्याचबराेबरच व्याजाने कर्जाचा आकडाही माेठा झाला.