आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गारपीटग्रस्त शेतकर्‍यांनी घातला तलाठय़ास घेराव

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

गारज - वैजापूर तालुक्यातील गारपीटग्रस्त शेतकर्‍यांकडे दुर्लक्ष करून र्मजीतील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे बोगस पंचनामे करणार्‍या तलाठय़ास पाथ्री येथे घेराव घालून जाब विचारण्यात आला.

दै. ‘दिव्य मराठी’च्या गुरुवारच्या (17 एप्रिल) अंकात र्मजीतील शेतकर्‍यांच्या नुकसानीचे पंचनामे असे वृत्त प्रकाशित झाले होते. या वृत्ताची दखल घेत वैजापूरचे तहसीलदार डॉ. पडघन यांनी मंडळ अधिकारी यांनी तलाठी सी. बी. शेख यांनी केलेल्या बोगस पंचनाम्याची चौकशी व उर्वरित गारपीटग्रस्त शेतकर्‍याच्या पिकांची पाहणी करून अहवाल मागवले आहेत.

लाखणी सजाचे तलाठी सी. बी. शेख यांनी आपल्या र्मजीतील शेतकर्‍याच्या नुकसानीचे पंचनामे करून इतरांना वार्‍यावर सोडल्यामुळे तलाठय़ास निलंबित करण्याची मागणी केली होती. या अनुषंगाने मंडळ अधिकारी, तलाठी, कृषी सहायक यांची भेट घेण्यात आल्यानंतर संतप्त शेतकर्‍यांनी घेराव घातला. या वेळी भगवान आधुडे, पंढरीनाथ दरेकर, हिरालाल आधुडे, चंद्रभान तेजनकर आदी उपस्थित होते.

पंचनामे करणार कधी
येत्या 24 मेपासून खरिपास सुरुवात होत आहे. परंतु गारपीटग्रस्त शेतकरी अनुदानापासून वंचित राहिले आहेत. शासनाच्या महसूल विभागाचे पदाधिकारी पंचनामा करतील. या आशेवर जगत आहेत. खरिपाची तयारी कधी करायची, हा प्रश्न शेतकर्‍यांना भेडसावत आहे.

ज्या वंचित शेतकर्‍यांनी तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना लेखी तक्रारी दिल्या, त्या शेतकर्‍यांना वंचित ठेवावे या हेतूने सी. बी. शेख आपल्या पदाचा गैरवापर करत आहेत. त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी, माफ करण्याचा प्रश्नच येत नाही. - गोरख कर्‍हाळे, गारपीटग्रस्त शेतकरी, पाथ्री

शेतकर्‍यांचा रोष पाहून मी तुम्हाला सर्व मदत करायला तयार आहे. झालेल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त करून सर्व शेतकर्‍यांची माफी मागतो. सी. बी. शेख, तलाठी

मंडळ अधिकार्‍यांकडून आम्ही रिपोर्ट मागवतो. त्यात दोषी असणार्‍यावर कारवाई करू.- प्रशांत पडघन, तहसीलदार