आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide At Kalamb And His Wife After Dead

नापिकीला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या; धक्क्याने पत्नीचाही मृत्यू

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब- तालुक्यातील कन्हेरवाडी येथील तरुण शेतकऱ्याने नापिकीला कंटाळून आत्महत्या केली आहे. हे दु:ख अनावर झाल्याने पत्नी चक्कर येऊन पडली. त्यामध्ये तिचाही मृत्यू झाला. या घटनेमुळे कळंब तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.

कळंब तालुक्यातील कन्हेरवाडी येथे नारायण भैरू मिटकरी यांना एक हेक्टर ४९ आर जमीन आहे. नारायण मिटकरी त्यांचा मुलगा बालाजी नारायण मिटकरी (३२) हे शेतात राहतात. जानेवारी रोजी सकाळपासून बालाजी त्याची पत्नी भाग्यश्री शेतात काम करत होते. सकाळी ११ वाजेच्या सुमारास बालाजी फिरून येतो म्हणून निघून गेला. पती अजून येत नसल्यामुळे पत्नी भाग्यश्रीने शोधण्यास सुरुवात केली. त्यावेळी शेतातील बाभळीच्या झाडाला बालाजीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले. त्यावेळी भाग्यश्रीला हे दुःख अनावर झाल्याने तिला चक्कर आली. चक्कर येऊन पडल्यामुळे तिचाही मृत्यू झाला. मुलगा सून कोठे गेले आहेत, हे पाहण्यासाठी वडील नारायण मिटकरी यांनी शोधाशोध सुरू केली. त्यावेळी मुलाने आत्महत्या केली असून सून खाली पडल्याचे दिसून आले. सून भाग्यश्री हीचे शरीर गरम लागत होते. त्यामुळे नारायण मिटकरी यांनी सुनेला कळंब येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यावेळी डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. बालाजीचे शवविच्छेदन इटकूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात करण्यात आले.

तीन मुलांचे छत्र हरपले
कन्हेरवाडीयेथील बालाजी भाग्यश्री यांचा दुष्काळाने बळी घेतला. त्यामुळे त्यांच्या दोन मुली एका मुलाचे छत्र हरपले आहे. यामुळे तालुक्यात हळहळ व्यक्त होत आहे.

कळंब तालुक्यातील पहिली घटना
कळंबतालुक्यातील शेतकऱ्यांचे आत्महत्याचे सत्र थांबण्याचे नाव घेत नाही. मागील वर्षात ३३ शेतकऱ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत. कन्हेरवाडी येथे शेतकऱ्याची आत्महत्या पाहून पत्नीने जीव सोडला असून अशी घटना तालुक्यातील पहिलीच आहे.