आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide Case And Water Planning News In Marathi

जलनियोजन फसल्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या, जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह यांचे मत

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई- महाराष्ट्रातसर्वाधिक आत्महत्या होण्यामागे फसलेले जलनियोजन हेच कारण आहे. देशात ४० टक्के धरणे असलेल्या महाराष्ट्राने सक्षम जलनीतीसाठी राष्ट्रीय पातळीवर दबाव गट तयार करावा. या कामी मी पुढाकार घेईन, अशी ग्वाही जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह राणा यांनी दिली.

सक्षम जलनीती परिषदेच्या उद्‍घाटनप्रसंगी राजेंद्रसिंह म्हणाले, पावसाच्या प्रत्येक थेंबाला, पीक पद्धतीला आपण समजून घेणार नाही तोपर्यंत सक्षम जलनीती विकसित होऊ शकणार नाही. उपलब्ध पाणी, त्याचा सुयोग्य वापर, जलस्रोताचे आरोग्य, नदी-नाल्यांचे पुनरुज्जीवन याकडे गांभीर्याने लक्ष देणार नसाल तर जलस्वयंपूर्तता कशी साध्य होणार. या वेळी जलतज्ज्ञ डॉ. द्वारकादास लोहिया, माजी आमदार पाशा पटेल, दि. गा. मोरे यांची या वेळी प्रमुख उपस्थिती होती. विचार मंथनात पाण्याची उपलब्धता, नदीचे पुनरुज्जीवन ग्रामीण जीवनाचे पुनरुत्थान याबाबत जलअभ्यासक मुकुंद धाराशिवकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रा. विजय दिवाण, अभिजित घोरपडे, विकास गोडसे, सुनील जोशी यांनी विचार व्यक्त केले.
शेतकऱ्यांच्या हिताचा, जलसुरक्षिततेचा, सक्षम जलनीतीचा धोरणात गांभीर्याने समावेश झाला नाही. यासाठी असलेल्या समित्या फारशा गंभीर नाहीत, अशी खंत केंद्रीय कृषी मूल्य आयोगाचे सदस्य पाशा पटेल यांनी व्यक्त केली.

पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी
>शिवारातीलपाणी शिवारातच वापरण्यावर भर.
> जलसंधारण विकसित क्षेत्रात विंधन विहिरींना अटकाव.
>गावनिहाय पाणीपुरवठा नियोजन, विहिरींना प्रोत्साहन
>दुष्काळी गावांना वॉटर हार्वेस्टिंगसाठी अर्थसाहाय्य.
>नव्या विहिरींना प्रोत्साहन, कॅनॉलऐवजी पाइपलाइन
>ठिबक, स्प्रिंकलर, शेडनेट, हरितगृहांना प्रोत्साहन,
>धरणातील पाणी कॅनॉलऐवजी पाइपलाइनने द्यावे.