आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide Case At Jalna, FIR Against Bank Officer

शेतकरी आत्महत्या; बँक व्यवस्थापक, अधिकाऱ्यावर गुन्हा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना/जामखेड- अंबड तालुक्यातील शेतकरी आत्महत्येप्रकरणी युनियन बँक ऑफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापकासह, कृषी अधिकाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी मृत शेतकऱ्याच्या भावाने पोलिसांत दिलेल्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. पी. आर. कांबळे असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या शाखा व्यवस्थापकाचे नाव आहे.
अंबड तालुक्यातील माळ्याची वाडी येथील शेतकरी सुरेश चंद्रभान चेडे यांनी शेततळ्यात प्लास्टिक आच्छादन टाकण्यासाठी बॅँकेचे कर्ज मंजूर करून पहिला हप्ता द्या, अशी मागणी युनियन बँक आॅफ इंडियाचे शाखा व्यवस्थापक कांबळे यांच्याकडे केली होती. मात्र, कांबळे यांनी तुम्ही बँकेची पॉलिसी काढा, हप्ता मंजूर करतो अशी अट घातली. पैसे नसल्यामुळे सुरेश चेडे यांनी वारंवार बॅँकेत जाऊन विनंती केली. मात्र, पॉलिसी काढल्यामुळे कर्ज मंजूर झाले नाही. परिणामी, शाखा व्यवस्थापक कृषी अधिकाऱ्याच्या त्रासाला कंटाळून सुरेश यांनी सोमवारी लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली, असे त्यांचे बंधू सोमनाथ चेडे यांनी अंबड पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.