आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पाऊस पडत नसल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - मागील वर्षीचा दुष्काळ, गारपीट व पाऊस पडत नसल्याने खर्च कसा भागवायचा या विवंचनेत असलेल्या शेतकर्‍याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना गेवराई तालुक्यातील मारफळा येथे 28 जून रोजी घडली.

गेवराई तालुक्यात मागील दोन वर्षांपूर्वी दुष्काळ पडला होता. त्यानंतर रब्बी हंगामात झालेल्या गारपिटीमुळे नुकसान झाले. जून महिना संपत आला तरी पाऊस येत नसल्याने तालुक्यातील मारफळा येथील शेतकरी अंकुश देवराव कुटे (42) यांनी आता खर्च कसा भागवणार या विवंचनेत राहत्या घरी पत्र्याच्या आडूला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केली. या शेतकर्‍यास तीन एकर शेती होती. याप्रकरणी देविदास देवराव कुटे यांनी तलवडा ठाण्यात दिलेल्या माहितीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

यंदा पाऊसकाळ चांगला होईल, अशी प्रत्येकालाच आशा होती. मात्र, जून महिना संपत आला तरी आसामचा काही भाग वगळता देशातील बहुतांश भागांत पावसाचा मागमूस नाही.