आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

बीड जिल्ह्यात आणखी दोन शेतकरी आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
केज | बीड - जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांची मालिका सुरूच असून नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून शुक्रवारी सकाळी केज व आष्टी तालुक्यातील दोन शेतकर्‍यांनी गळफास घेऊन जीवनयात्रा संपवली.

तालुक्यातील डोका येथील खंडू सुंदरराव भांगे (३५) या शेतकर्‍याने शेतीसाठी वेगवेगळ्या ठिकाणांहून कर्ज घेतले होते. यंदा वेळेवर पाऊस झाला नसल्याने पिके वाया गेली. त्यामुळे कर्जबाजारीपणाला कंटाळून भांगे या शेतकर्‍याने शुक्रवारी सकाळी साडेसहा वाजता गावाच्या पश्चिमेस दोन किलोमीटर अंतरावरील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली.
शेतकर्‍याच्या पश्चात पत्नी, चार वर्षांचा मुलगा आणि दोन वर्षांची मुलगी आहे. शेतकरी आत्महत्येची दुसरी घटना आष्टी तालुक्यातील खलाटवाडी येथे शुक्रवारी सकाळी घडली. विठ्ठल जालिंदर खलाटे (३०) या शेतकर्‍याने लिंबाच्या झाडाला दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केेली. सकाळी त्यांचा मृतदेह ग्रामस्थांना दिसला.

शेतकरी महिलेची आत्महत्या
लातूर - औसा तालुक्यातील कारला येथील शेतकरी महिलेने गुरुवारी गळफास घेवून आत्महत्या केली. या प्रकरणी शुक्रवारी किल्लारी पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. देवता दत्तू चेंडके (४५) असे मृत महिलेचे नाव आहे. देवता यांनी घराच्या भिंतीच्या हुकाला गळफास घेतला.

जालना जिल्ह्यात दोन शेतकर्‍यांच्या आत्महत्या
जालना, जामखेड - दुष्काळ आणि कर्जबाजारीपणाला कंटाळून जिल्ह्यातील दोन शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या.

जालना तालुक्यातील माळशेंद्रा येथील हरिभाऊ जिजा जाधव (४०) या शेतकर्‍याने कर्ज व सततच्या नापिकीस कंटाळून शेतात विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, जालना येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरू असताना या शेतकर्‍याचा मृत्यू झाला. नशुक्रवारी सकाळी ही घटना उघडकीस आली. त्यांच्यावर बँकेसह खासगी सावकाराचे कर्ज होते. त्यांच्या पश्चात पत्नी, ३ मुली व मुलगा आहे. याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात नांेद करण्यात आली. तसेच अंबड तालुक्यातील किनगाव येथील शेतकरी सखाराम पंढरीनाथ चौधरी (४०) या शेतकर्‍याने शुक्रवारी दुपारी २ वाजता स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी अंबड ठाण्यात अकस्मात मृत्यूची नांेद करण्यात आली आहे.