आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आष्टीत कर्जबाजारी शेतकऱ्याने घेतला गळफास, कर्जासोबत दुबार पेरणीचीही होती चिंता...

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मृत शेतकरी रोहिदास विठोबा शिंदे. - Divya Marathi
मृत शेतकरी रोहिदास विठोबा शिंदे.
आष्टी - परतूर तालुक्यातील आष्टी येथे कर्जास कंटाळून एका शेतकऱ्याने स्वत:च्या शेतातील लिंबाच्या झाडास केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी पहाटे उघडकीस आली. रोहिदास विठोबा शिंदे (४५) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. 
- शिंदे यांच्या नावे आष्टी शिवारात गट क्रमांक ६१८ मध्ये दोन एकर शेती असून शेतीसह मोलमजुरी करून त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालत असे. गेल्या आठ-दहा दिवसांपूर्वी त्यांनी आपल्या शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र, तेव्हापासून पाऊस न पडल्यामुळे ते चिंतेत होते. महागडे बी-बियाणे खरेदी करून लागवड केल्यावर ते न उगवल्यामुळे व दुबार पेरणीच्या चिंतेमुळे ते निराश झाले होते. 

- त्यांनी एसबीआय बँकेकडून कर्ज घेतलेले होते. दुबार पेरणी झाल्यास पैशाची तडजोड तसेच मुलीस उच्च शिक्षणासाठी लागत असलेल्या पैशामुळे चिंताग्रस्त अवस्थेतच ते शुक्रवारी रात्री शेतात गेले. त्यानंतर मध्यरात्रीच्या सुमारास शेतातील लिंबाच्या झाडास केबल वायरने गळफास घेऊन आत्महत्या केली. शनिवारी पहाटे शेजारच्या शेतकऱ्यांच्या हा प्रकार लक्षात आल्यावर त्यांनी तत्काळ कुटुंबीयांना माहिती दिली.
-घटनेची माहिती मिळताच गावातील शेकडो नागरिकांनी शेताकडे धाव घेतली. याबाबत त्यांचे बंधू अरुण विठ्ठलराव शिंदे यांच्या माहितीवरून आष्टी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. दरम्यान, पोलिसांनी पंचनामा केला असून तपास सहायक फौजदार प्रवीण देशमुख हे करीत आहेत.
बातम्या आणखी आहेत...