आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मनाबाद: नापिकी, कर्जाला कंटाळून शेतकऱ्याने जीवन संपवले

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कळंब - तालुक्यातील इटकूर येथील बालाजी दादाराव आडसूळ या ३२ वर्षीय तरुणाने नापिकी व कर्जबाजारीपणाला कंटाळून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी साडेचारच्या सुमारास उघडकीस आली आहे. यंदा पावसाने दडी मारल्याने बालाजी आडसूळ यांच्या शेतातील सोयाबीन व कापसाचे पीक डोळ्यादेखत करपून गेले. खासगी देणे व कर्ज कसे, फेडायचे याच्या विवंचनेत ते होते. यातच त्यांनी गुरुवारी (दि. १०) घरातील मंडळी शेतात व मुले शाळेत गेल्यावर गळफास घेतला. मुले शाळेतून परतल्यावर ही घटना उघडकीस आली. कुटुंबावर सोसायटीचे पीक कर्ज असून बालाजीचे खाते थकीत असल्याचे समजते. याप्रकरणी तलाठी मोरे यांनी भेट देऊन आडसूळ कुटुंबीयांचे सांत्वन केले. बालाजी यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी व तीन मुले आहेत.
बातम्या आणखी आहेत...