आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिरोडीत विष घेऊन शेतकर्‍याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औराळा - कन्नड तालुक्यातील शिरोडी येथील 44 वर्षीय शेतकर्‍याने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना गुरुवारी सकाळी 11.30 वाजेच्या सुमारास घडली. शेकू गोविंद जाधव असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे. याप्रकरणी कन्नड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक सुभाष भुजंग यांच्या मार्गदर्शनाखाली बीट जमादार दीपेश नागझरे करत आहेत.