आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात शेतकऱ्यांची फाशी घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वडवणी/अंबाजाेगाई - दुष्काळाच्या कचाट्यात अडकलेल्या मराठवाड्यातील तीन शेतकऱ्यांनी अखेर मरणाला कवटाळले. कर्ज नापिकीच्या चिंतेने त्यांनी आपले जीवन संपवले. बीड जिल्ह्यातील दोघे तर परभणी जिल्ह्यातील एकाचा मृतात समावेश आहे.

वडवणीतील दामोदरवाडी येथील शेतकरी शिवाजी रामभाऊ दामोदरे (४५) या शेतकऱ्याने देवळा ते दामोदरवाडी शिवारातील राधाकिसन रेडे यांच्या शेतातील नदीच्या कडेला असलेल्या अांब्याच्या झाडाला गळफास घेऊन अात्महत्या केली. ही घटना रविवारी रात्री साडेनऊ ते दहाच्या दरम्यान घडली. सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास शोधाशोध केल्यानंतर सदरील शेतकऱ्याचा मृतदेह झाडाला लटकलेला अाढळला. शिवाजी दामाेदरे यांना अडीच एकर काेरडवाहू जमीन असून त्यातही नापिकी, दुष्काळी परिस्थिती बँकेचे असलेले कर्ज कसे भरायचे या विवंचनेत शेतकऱ्याने मरण जवळ केले.
अंबाजाेगाई तालुक्यातील काेदरी येथील उत्तरेश्वर भागवत बेलेकर (२२) या तरुण शेतकऱ्याने स्वत:च्याच शेतातील झाडाला गळफास लावून अात्महत्या केल्याचे साेमवारी सकाळी अाढळून अाले. शवविच्छेदन स्वारातीमध्ये, तर या प्रकरणाची नाेंद अंबाजाेगाई ग्रामीण पाेलिस ठाण्यात करण्यात अाली अाहे.