आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याची नांदूर मधमेश्वर कालव्यात उडी घेऊन आत्महत्या

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गंगापूर - पिंप्री येथील शेतकरी अशोक मच्छिंद्र सटाले (३८) यांनी १७  फेब्रुवारी रोजी कर्जबाजारीपणास कंटाळून नांदूर मधमेश्वर कालव्यात उडी घेऊन आत्महत्या केली.  मृत अशोक मच्छिंद्र सटाले या शेतकऱ्याकडे दीड एकर जमीन होती. सहा महिन्यांपूर्वी मुलीचे लग्न झाल्याने ते आर्थिक विवंचनेत होते. त्यातच नेवरगाव येथील स्टेट बँक ऑफ हैदराबादचे कर्ज, सोसायटीचे कर्ज यामुळे मागील काही दिवसांपासून बेचैन होते.   अशोक सटाले यांनी शुक्रवारी दुपारी कालव्यात वाघ वस्तीजवळ उडी घेतली होती. 
बातम्या आणखी आहेत...