आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लिंबगावात गळफास घेऊन शेतकऱ्याची आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड- कर्जबाजारीपणाला कंटाळून ३१ वर्षीय शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना लिंबगाव येथे घडली. कृष्णा प्रभाकर निर्मळ (रा. लिंबगाव) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. लिंबगाव परिसरात तीन वर्षांपासून दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच शेतातून काहीच उत्पन्न मिळत नसल्याने निर्मळ यांनी कर्ज काढले होते. यंदाही भयावह परिस्थिती असल्याने शनिवारी त्यांनी ज्ञानदेव टिंगळे यांच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेची माहिती निर्मळच्या नातेवाइकांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पोलिसांसह नातेवाइकांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोडच्या रुग्णालयात दाखल केला.