आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पाचोड - नापिकी कर्जबाजारीपणाला कंटाळून २८ वर्षीय शेतकऱ्याने राहत्या घरी विषा प्राशन करून जिवनयात्रा संपवल्याची घटना मुरमा येथे मंगळवारी दुपारी घडली.

मुरमा (ता.पैठण) येथील आत्माराम भाऊसाहेब मानमोडे (वय २८वर्ष ) असे मृत शेतक ऱ्याचे नाव आहे. मुरमा शिवारात जमीन गट क्रमांक १८१ मध्ये दोन एकर शेती असून गेल्या पाच -सहा वर्षापासून दुष्काळी स्थितीमुळे शेतीत अपेक्षित उत्पन्न मिळाले नसल्याने ते हताश झाले होते.यावर्षी शेतीवर झालेला खर्चही निघाला नाही. शेतीसाठी त्याने पाचोड येथील बँकेकडून ४० हजार तर महिंद्रा फायनान्सकडून एक लाख दहा हजार रुपये कर्ज घेतले. मात्र शेतीतून काहीच मिळाले नाही. कर्ज फेडण्याची चिंता त्यांना लागल्याने तणाव वाढत होता. यातच मंगळवारी सर्व जण शेतात गेल्याने घरी तो एकटाच होता. त्याने राहत्या घरी विषारी औषध प्राशन करून जीवनयात्रा संपवली. त्याची आजी भिवराबाई मानमोडे ह्या पाणी पिण्यास आल्यानंतर हा प्रकार समोर अाला.

या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थांसह पाचोड पोलिसंानी घटनास्थळी धाव घेतली. ग्रामस्थ, नातेवाइकांच्या मदतीने मृतदेह पाचोडच्या ग्रामीण रुग्णालयात हलवला. वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण बोडेवार यांनी तपासून मृत घोषित केले. याप्रकरणी पाचोड पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली.