आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आत्महत्या रोखण्यासाठी नाटक: लग्नात अनावश्यक खर्च टाळला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड- लग्नात पैशांची उधळण करता सामाजिक भान ठेवत शेतकऱ्याच्या मुलाचे बीडमध्ये साखरपुड्यातच शुभमंगल होत आहे. लग्नात डीजेवर खर्च करता गावात "कारण फक्त पैसा' या शेतकरी आत्महत्येवरील नाटकाचा प्रयोग ठेवला असून यात बीडचे तरुण कलाकार आहेत.
केज तालुक्यातील देवदहीफळ म्हटले की डोळ्यासमोर खंडोबाचे मंदिर आणि मराठी चित्रपट "जय जनता जनार्दन'चे दिवंगत दिग्दर्शक श्रीराम बडे यांचा चेहरा समोर येतो. बडे यांनी बीडमध्ये नाट्य चळवळ चालवली होती. त्यांच्याच गावात आता शेतकरी आत्महत्येवर आधारित मराठी नाटकाचा प्रयोग १५ मे रोजी रात्री सात वाजता होणार आहे.शेतकऱ्याचा मुलगा असलेले सतीश लक्ष्मण बडे हे शहरातील फुलाईनगर विद्यानिकेतन निवासी गुरुकुल चालवत आहेत. गावात तीन एकर शेती असून दोन विवाहित बहिणी एक अविवाहित भाऊ आहे. केएसकेतील नाट्यशास्त्र विभागात सतीश बडे यांनी प्रवेश घेतला. औरंगाबाद युवक फेस्टिव्हलमध्ये केएसकेच्या नाट्यशास्त्र विभागात शिक्षण घेणाऱ्या प्रसाद खडके या तरुणाशी त्यांची मैत्री झाली. सतीशच्या विवाहाची बैठक गुंदावडगावात होऊन शेतकरी किसन देव नागरगोजे यांची मुलगी सविताशी साखरपुड्यात विवाह करण्याचे ठरले.

शुक्रवारी देवदहीफळला प्रयोग
विवाहातडीजेवर खर्च करण्याचा निर्णय सतीशने घेतला असून देवदहीफळाला शुक्रवारी संध्याकाळी सात वाजता कारण फक्त पैसा हे मराठी नाटकाचा विनामूल्य प्रयोग होणार आहे. या नाटकाची स्क्रिप्ट प्रसाद खडके या तरुणाने लिहिली असून नाटकात शेतकरी, त्याची पत्नी, मुलगी, मुलगा, सावकार, सावकाराचा बॉडीगार्ड, प्रतिष्ठित व्यक्ती, लावणीतील कलाकार असे जवळपास १२ पात्र राहणार आहेत.
बातम्या आणखी आहेत...