आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धानोर्‍यात कर्जबाजारी शेतकर्‍याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिल्लोड - धानोरा येथील शेतकर्‍याने कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतात विष प्राशन करून जीवनयात्रा संपवली. रमेश रामदास काकडे (35) असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे. काकडे यांच्या नावावर 90 आर एवढी शेतजमीन आहे. नुकत्याच झालेल्या गारपिटीत त्यांचे पीक वाया गेले. तसेच कर्जाचा डोंगर डोक्यावर असल्याने नैराश्यापोटी या शेतकर्‍याने शनिवारी आत्महत्या केली. विष घेतल्यानंतर काही वेळात त्यांना सिल्लोड येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र, प्रकृती खालवल्याने त्यांना औरंगाबाद येथील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान रविवारी पहाटे 3 च्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात पत्नी, सात वर्षांची मुलगी, तीन वर्षांचा मुलगा असा परिवार आहे.