आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक गेल्याने शेतकर्‍याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वैजापूर - जोरदार गारपीट व पावसाच्या तडाख्यामुळे हातातोंडाशी आलेले कांद्याचे उभे पीक होत्याचे नव्हते झाल्याचे दृश्य पाहून नैराश्याच्या गर्तेत सापडलेल्या 40 वर्षीय शेतकर्‍याने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरुवारी वैजापूर तालुक्यातील बोरसर येथे घडली. दत्तू नारायण शेवाळे असे आत्महत्या करणार्‍या शेतकर्‍याचे नाव आहे.

दत्तू शेवाळे यांची गावशिवारात साडेचार एकर जमीन आहे; परंतु कमी पाऊस झाल्यामुळे गावातील अशोक होले यांच्या शेतात ठेका पद्धतीने त्यांनी उन्हाळी कांदा पिकाची लागवड केली होती. लागवड केलेले कांद्याचे पीक परिपक्व होण्याच्या मार्गावर असतानाच बुधवारी कोसळलेल्या अवकाळी गारपिटीच्या पावसामुळे पीक होत्याचे नव्हते झाले. गुरुवारी सकाळी दत्तू शेवाळे शेतात गेले होते. त्यांनी पिकाची नासाडी पाहून व त्यासाठी लावलेला पैसा याचा विचार केला. आर्थिक गणित कोलमडल्यामुळे नैराश्याच्या गर्तेत त्यांनी भिवगाव शिवारातील भीमराव गायके यांच्या विहिरीत उडी मारून जीवनयात्रा संपवली.