आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बीड, परभणी, नांदेडमध्ये पाच शेतकर्‍यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड/नांदेड/परभणी - गारपिटीनंतर झालेल्या नुकसानीमुळे वेगवेगळ्या घटनांत बीड जिल्ह्यात तीन तर परभणी व नांदेड जिल्ह्यात प्रत्येकी एक अशा पाच शेतकर्‍यांनी आत्महत्या केल्या आहेत.

किल्लेधारूर तालुक्यातील देवदहीफळ येथील रामराव कारभारी बडे (48) या शेतकर्‍याने कीटकनाशक घेऊन बुधवारी आत्महत्या केली. बीड तालुक्यातील हिंगणी येथील रामहरी लिंबाजी तांदळे (35) यांनी गळफास घेतला. परळी तालुक्यातील नागपिंपरी येथील भागोजी गणपत रंजवे (60) यांनीही विष पिऊन आत्महत्या केली. बिलोली तालुक्यातील थडी सावळी येथील दिगंबर दाऊ भंडारे (55) या शेतकर्‍याने गळफास घेतला. आजदापूर (ता.पूर्णा) येथील रामा रमेश वैद्य (22) याने गळफास घेतला.