आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंगोली, परभणीत तीन शेतकर्‍यांच्या आत्महत्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हिंगोली / परभणी / उस्मानाबाद - गारपिटीमुळे शेतीपिकांचे मोठे नुकसान झाल्यामुळे वैफल्यग्रस्थ तीन शेतकर्‍यांनी आत्महत्या केली. परमेश्वर पुरभाजी बनसोडे (30, रा. देगाव, ता. पूर्णा, जि. परभणी), संतोष आभानराव शृंगारे (26, सावंगी, ता. कळमनुरी), महाळू मनगीन चाफे (23, रा. दिंडेगाव, ता. तुळजापूर) अशी मृतांची नावे आहेत. शृंगारे यांच्या नावावर तीन एकर शेती आहे. भूविकास बँकेचे 1 लाखाचे, तर अन्य 20 हजारांचे कर्ज त्यांच्या डोक्यावर होते. हातातोंडाशी आलेला गहू आणि हरभर्‍याचा घास गारपिटीने हिरावला. यामुळे शृंगारे मानसिक तणावाखाली होते. त्यातच त्यांनी गुरुवारी विष प्राशन केले.

परमेश्वर बनसोडे या युवक शेतकर्‍याकडे वडिलांच्या नावाने दीड एकर शेती आहे, परंतु या शेतीतून उदरनिर्वाह होऊ शकत नसल्याने त्याने सालगडी म्हणून काम केले. त्याच्यावर एसबीआयचे 45 हजारांचे कर्जही होते. कर्ज परतफेडच्या नैराश्यातूनच त्याने गुरुवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. दिंडेगाव येथील शेतकरी महाळू मनगीन चाफे हे बेपत्ता होते. दरम्यान, त्यांचा मृतदेह आढळला.