आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Farmer Suicide News In Marathi, Soya, Divya Marathi

लातूर जिल्ह्यात सोयाबीन न उगवल्याने शेतक-याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - देवणी तालुक्यातील सय्यदपूर येथील शेतक-याने सोयाबीन न उगवल्याने आत्महत्या केल्याची चर्चा आहे. परंतु देवणी पोलिस ठाण्यात याप्रकरणी तूर्त अकस्मात मृत्यूचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

किसनराव केरबा पताळे (50) असे मृताचे नाव आहे. यंदा त्यांनी पाच एकर शेतीत सोयाबीन पेरले. मात्र, ते उगवलेच नाही. त्यांच्या डोक्यावर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे 40 तर अलाहाबाद बँकेचे 59 हजार कर्ज होते. शिवाय खासगी सावकाराचे देणेही होते. त्यातच सोयाबीन न उगवल्याने त्यांनी आपले जीवन संपवले.

धोपटेश्वर येथे आत्महत्या
धोपटेश्वर येथील शेतक-याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याचा प्रकार शनिवारी उघडकीस आला. बळीराम माणिकराव आहेर (47) असे मृताचे नाव आहे. शुक्रवारी रात्री त्यांनी विष प्राशन केले होते.