आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाथरी तालुक्यात शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - पाथरी तालुक्यातील फुलारवाडी येथील शेतकऱ्याने बँकेचे कर्ज व शेतात पेरणीच झाली नसल्याच्या कारणावरून शुक्रवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास वाघाळा येथील स्वत:च्या शेतात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. हनुमान जिजाभाऊ नवले (३१) असे या शेतकऱ्याचे नाव आहे.

घरात आई-वडील, पत्नी, मुलगा, मुलगी व लहान भाऊ असा परिवार असल्याने मोठा या नात्याने त्याच्यावर कुटुंबीयांची भिस्त होती. यावर्षी पावसाच्या प्रतीक्षेत शेतात
पेरणीच होऊ शकली नाही.
कंधार तालुक्यात शेतकऱ्याची आत्महत्या
कंधार तालुक्यातील गऊळ येथे गुरुवारी रात्री १० वाजताच्या सुमाराला वसंत रामकिशन तेलंग (५५) या शेतकऱ्याने कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून शेतातील आखाड्याजवळ लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. दोन वर्षांपासून सातत्याने नापिकी होत असल्याने तो हताश झाला होता. या प्रकरणी सुभाष रामकिशन तेलंग यांनी दिलेल्या माहितीवरून कंधार पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. या महिन्यातील जिल्ह्यातील ही सातवी आत्महत्या आहे.
बातम्या आणखी आहेत...