आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

१९ गावांतील शेतकऱ्यांचे वीज कंपनीच्या प्रश्नांवर उपोषण

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - कौसडी सर्कल (ता. जिंतूर) मधील वीज प्रश्नांची सोडवणूक करण्यात यावी, या मागणीसाठी या सर्कलमधील १९ गावांतील शेतकऱ्यांनी गुरुवारी (दि. २४) येथील वीज वितरण कंपनीच्या अधीक्षक अभियंता कार्यालयासमोर शिवसेनेचे प्रभाकर वाघीकर यांच्या नेतृत्वाखाली उपोषण केले. दरम्यान, कंपनीने उपोषणाची दखल घेत ही कामे लवकरच पूर्ण करण्याचे आश्वासन दिले.

शेतकऱ्यांना दिवसा सहा तास व रात्री सहा तास असा १२ तास वीजपुरवठा करण्यात यावा, ट्रान्सफॉर्मर दुरुस्ती, स्विच, केबल व फ्यूज बदलून देण्यात यावेत, सर्व गावांमध्ये सिंगल फेज यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, ट्रान्सफॉर्मरवरील अधिकचा वीजभार कमी करण्यात यावा, जुने केबल बदलण्यात यावे व गावठाणमध्ये नवीन जोडणी देण्यात यावी आदी मागण्यांसाठी १९ गावांतील शेतकऱ्यांनी उपोषण सुरू केले. या उपोषणाची दखल घेत कंपनीच्या कार्यकारी अभियंत्यांनी वाघीकर यांना मागण्यांच्या सोडवणुकीसंदर्भात आश्वासनपर पत्र दिले.
बातम्या आणखी आहेत...