आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

कारखान्यांनी दिला अडीच हजारांचा भाव, आंदोलन मागे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - पैठण तालुक्यातील पाटेगाव येथे पाच दिवसांपासून सुरू असलेले ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे आंदोलन रविवारी कारखान्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा करून त्यांनी भाव जाहीर केल्यानंतर मागे घेण्यात आले. गाड्या अडवल्याने अनेकांचा ऊस जागेवर वाळला. त्यामुळे शेतकऱ्यांचे थोडेफार नुकसान झाले तरी योग्य भाव ऊस टाकण्याच्या अाधी मिळाल्याचे समाधान शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसून आले. आंदोलनाचा समारोप तहसीलदार, साखर संचालक, प्रतिनिधी शेतकऱ्यांच्या समक्ष झाला. या वेळी पश्चिम महाराष्ट्रातील नेते आंदोलनकर्त्यांनी आंदोलनाला प्रसिद्धी दिल्याबद्दल आभार व्यक्त केले. त्यात छत्रपती राजे संभाजीने २१०० रुपये भाव दिला तर गतवर्षी संत एकनाथने १६५० चा भाव दिला होता.

पैठणच्या पाटेगाव पुलाजवळ पाच दिवसांपासून उसाला योग्य भाव देण्याच्या मागणीसाठी आंदोलन सुरू होते. आज त्याला काहीसे यश आले असून पैठणमधील ऊस घेऊन जाणाऱ्या चार कारखान्यांनी रविवारी २५०० रुपयांचा भाव जाहीर केला. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यात पीयूष शुगर्स लि. नगर चे व्हा. चेअरमन संयम रेड्डी, गंगाखेड सहकारी साखर कारखाना, येडेश्वर सहकारी कारखाना, शंभुराजे कळंब चे चेअरमन महादेव अापटे या चार कारखान्यांनी रविवारी आपले प्रतिनिधी साखर संचालक रशिद शेख, स्थानिक तहसीलदार, पोलिस निरीक्षक अशोक गिरी, सुजित बढे गणेश शर्मा यांच्या उपस्थितीत भाव जाहीर केला. त्यानंतर आंदोलन मागे घेतले तर केदारेश्वर सहकारी कारखाना बोधेगाव, भेंडा शुगर्स लि., वृद्धेश्वर तासगाव या कारखान्यांनी २१०० रुपयांचा भाव जाहीर केला. त्या कारखान्यांना शेतकऱ्यांनी ऊस द्यायचा की नाही हे त्यांनी ठरावे यासह ऊस देताच पेमेंट, पुढील तीन वर्षे हमी भाव, काटा हा शेतकरी कारखाना या दोन्हींचा ग्राह्य धरला जावा या अटींवर पाचव्या दिवशी आंदोलन मागे घेण्यात आले.

तालुक्यात साडेचार हजार टनांवर ऊस उभा असून तो भाव जाहीर करता पश्चिम महाराष्ट्रातील कारखाने घेऊन जात होते. मात्र अाधी भाव जाहीर करा, तेव्हाच ऊस घेऊन जा, अशी भूमिका पैठणमधील शेतकऱ्यांनी घेत गेल्या पाच दिवसांपासून पाटेगाव या ठिकाणी चारशे उसाच्या गाड्या रोखल्या होत्या. या आंदोलनात पैठणमधील पुढाऱ्यांनी पाठ फिरवल्याने पश्चिम महाराष्ट्रातील शेतकरी नेत्याने चार दिवस या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले. आंदोलन उग्र होण्याचे लक्षण पाहताच पोलिसांनी पुढाकार घेत आज साखर संचालक शेख यांच्यासह पीयूष शुगर्स लि., गंगाखेड, येडेरश्वरी, शंभुराजे या कारखान्यांच्या प्रतिनिधींना आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांशी चर्चेला बोलावलेे होते. भाव जाहीर केल्यानंतर तत्काळ गाड्या सोडण्यात आल्या. या आंदोलनाचे नेतृत्व स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हंसराज वडगुले, प्रकाश वालवडकर, विजय भेंडे, संतोष सूर्यवंशी, अमर कदम, शिवाजी साबळे, संतोष रोडगे आदींनी केले.

आता दोन वेळा होणार उसाचा काटा
अनेकशेतकऱ्यांनी उसाचा काटा मारला जातो हा मुद्दा या ठिकाणी कारखान्याच्या प्रतिनिधीसमोर उपस्थित केला. त्यावर शेतकऱ्यांनी उसाचा काटा करून आणावा पुन्हा कारखाना जो काटा करेल तोही धरला जाईल, असे चर्चेत ठरले.

‘दिव्य मराठी’चे मानले अाभार
चार दिवसांपासून उसाचे आंदोलन सुरू असताना याची दखल ‘दिव्य मराठी’ने विशेषकरून घेतली. या निमित्ताने आज आंदोलनाच्या समारोपावेळी पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांनी ‘दिव्य मराठी’चे आभार मानले.

प. महाराष्ट्राला तारले पैठणच्या उसाने
सलगच्या दुष्काळाने पश्चिम महाराष्ट्रातील उसाचे क्षेत्र कमी झाल्याने पैठणमधील कारखाना बंद असल्याने यंदा पश्चिम महाराष्ट्रातील सर्वच कारखान्यांनी आपल्या कारखान्याच्या टोळ्या पैठणमध्ये टाकल्या. यंदा पश्चिम महाराष्ट्रातील कारखान्याला पैठणच्या उसाने तारल्याचे दिसून आले.

तेथे आंदोलन करा
उसाच्याभावासाठीपश्चिम महाराष्ट्रातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते येथे आले. आमच्या उसाला भाव मिळाला. परंतु काही येथीलच भाजपच्या कारखानेवाल्यांनी २१००चा भाव दिला त्यांच्या कारखान्यावर भाववाढीसाठी या नेत्यांनी आंदोलन करावे. - जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते
बातम्या आणखी आहेत...