आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सेझच्या जमिनीवर शेतकर्‍यांची बिर्‍हाडे, दुसर्‍या दिवशीही आंदोलन

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

करमाड - ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर यांच्या नेतृत्वाखाली शेंद्रा एमआयडीसीतील अजंता प्रोजेक्टने हडप केलेली जमीन ताब्यात घेण्याची प्रक्रिया बुधवारी सुरूच होती. काही शेतकर्‍यांनी नांगरणी केली, तर काहींनी पावसामुळे तंबू ठोकून मुलाबाळांसह बिर्‍हाड थाटले होते. शाळाही भरवण्यात आली. दरम्यान, चर्चेसाठी आलेल्या अधिकार्‍यांकडे पुरावे खोटे असल्याने बैठक निष्फळ ठरली.

सेझसाठी 100 हेक्टर जमीन देण्यात आली. परंतु एमआयडीसीने कायदेशीर बाबी पूर्ण न करता व कुठलाही मोबदला न देता ही जमीन हडप केली होती. याविरोधात मंगळवारपासून आंदोलन सुरू आहे. उपविभागीय अधिकारी संभाजी अडकुणे, एमआयडीसीचे विभागीय अधिकारी अण्णासाहेब शिंदे चर्चा करण्यासाठी आले होते. कागदपत्रांमध्ये कोरे करारपत्र, कोर्‍या ताबा पावत्या, कोरे संमतीपत्र, बनावट स्वाक्षर्‍या असल्याचे दिसून आले. निरक्षर शेतकर्‍यांच्या नावापुढे स्वाक्षर्‍या आढळून आल्या. अधिकार्‍यांना बोलता आले नाही. त्यामुळे चर्चा निष्फळ ठरली. आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार शेतकर्‍यांनी व्यक्त केला. दरम्यान, एमआयडीसीचे अधिकारी शिंदे चर्चा करण्याऐवजी मुंबईशी संपर्क साधत होते.


आज निकालाची शक्यता
जमिनीच्या वादासंदर्भात न्यायालयाचा निकाल गुरुवारी येण्याची शक्यता आहे. त्याकडे शेतकर्‍यांसह अधिकार्‍यांचे लक्ष लागून आहे.