आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रिय पप्पा, भाऊंप्रमाणे तुम्हीही कंटाळून आत्महत्या करू नये म्हणून मीच माझे जीवन संपवते!

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
परभणी - शेतकरी वडील कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्या करतील या भितीने परभणीत एका 17 वर्षांच्या मुलीने आपले जीवन संपवले आहे. 5-6 दिवसांपू्र्वीच शेतातील पीक जाळून गेल्याने काकांनी आत्महत्या केली होती. वडिलांचेही पीक पूर्णपणे खराब झाले आहे. त्यातच आपल्या लग्नाचा खर्च उचलण्याच्या तानात वडीलही आत्महत्या करतील या भितीने तिने हा पाऊल उचलल्याचे पत्रात लिहिले होते. 

पाथरी तालुक्यात गेल्या दोन महिन्यांपासून पाऊस नाही. खरिपाची पेरणी पूर्णतः वाया गेली आहे. शेतातील पिके करपून जात आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी चिंतेत आहेत. बँकेच्या कर्जमाफीचा अनेक शेतकऱ्यांना अद्याप लाभ मिळालेला नाही. 3 ऑगस्ट रोजी जवळाझुटा येथील चंडिकादास झुटे या शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केली होती. या घटनेच्या सहा दिवसानंतर चंडिकादास झुटे यांच्या भावाची मुलगी सारीका सुरेश झुटे हिने आत्महत्या केली आहे. ती 12 वीत शिकत होती. ताईंच्या लग्नासाठी काढलेले कर्ज अजुनही फिटलेले नाही. त्यातच तुम्ही कर्ज घेऊन पीकांसाठी केलेली मेहनत सुद्धा वाया गेली. अशात माझ्या लग्नाचा ताण येऊ नये म्हणून हे टोकाचे पाउल उचलत असल्याचे तिने सांगितले.
बातम्या आणखी आहेत...