आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना उशिरा का होईना मिळाली मदत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जापूर-तालुक्यातील मार्च महिन्यात अवकाळी व गारपिटीच्या पावसाने हतबल केलेल्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर प्रशासनाने उशिरा का होईना आर्थिक मदत जमा करण्याची कार्यवाही सुरू केली आहे.
तालुक्यातील १७ गावांतील २ हजार १२४ शेतकऱ्यांना एकूण ५४ लाख ३३ हजार ४८० रुपयांची मदत झालेल्या नुकसानीपोटी दिली जाणार आहे. शासनाने महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांमार्फत पंचनामे केले होते. या पंचनाम्याच्या आधारे तालुक्यातील १७ गावांसाठी ५४ लाख रुपयांची मदत शासनाने मंजूर केली. मागील महिन्यात ही रक्कम तहसील कार्यालयात जमाही झाली होती. गारपीटग्रस्त गावांचे पंचनामे हे इतर गावांच्या तलाठी व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांकडून ज्या तलाठ्यांनी केले होते त्यांच्याकडून अंतिम यादी प्राप्त झालेली नसल्याने मागील एक महिन्यापासून हा निधी कार्यालयात पडून होता. शुक्रवारी अखेरीस हा निधी जिल्हा बँकेकडे वर्ग करण्यात आला.

तालुक्यातील गावनिहाय शेतकरी संख्या व अनुदान पुढीलप्रमाणे - बाबतारा (९३ शेतकरी २ लाख ७२ हजार ८२० रुपये), बाभूळगाव ( ५४ शेतकरी २ लाख ४ हजार ३०), भालगाव ( ५८ शेतकरी २ लाख १२ हजार ७००), चांडगाव (८८ शेतकरी ३ लाख १४ हजार २५०), डागपिंपळगाव (१३१ शेतकरी २ लाख ७६ हजार ३००), डोणगाव (१५१ शेतकरी ८ लाख ९७ हजार ३००), फाकिराबादवाडी (१६४ शेतकरी ४ लाख ८६ हजार), हिंगोनी (८५ शेतकरी १ लाख ५३ हजार ९००), जातेगाव ( ३०२ शेतकरी ६ लाख ६७ हजार ८००), कांगोनी (९३ शेतकरी ३७ हजार ३५०), कौटगाव (१०८ शेतकरी १ लाख ९८ हजार ९००), लाखगंगा (९४ शेतकरी २ लाख ५६ हजार ५०), नादी (२०७ शेतकरी २ लाख १७ हजार ७७०), नांदूरढोक (९२३ शेतकरी ६४ हजार ७७०), पानवी (२०१ शेतकरी ३ लाख ७५ हजार ७५०), पुरणगाव (१२५ शेतकरी ५ लाख ६२ हजार ५०), सावखेडगंगा (१४७ शेतकरी २ लाख १०० रुपये) अशी एकूण ५४ लाख ३३ हजार ४८२ रुपयांची मदत दिली जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...