आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकरी जगला तरच राष्ट्र जगेल - बबनराव लोणीकर

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - मराठवाडा, विदर्भ व पश्चिम महाराष्ट्रातील काही गावांत दुष्काळी परस्थिती आहे. यातून सावरण्यासाठी सरकारने साडेसात हजार कोटींचे पॅकेज घोषित केले आहे. शेतक-यांना मुबलक पाणी, वीज, शेतमालास भाव मिळाला पाहिजे. शेतकरी जगला तरच राष्ट्र जगेल. शेतकरी ताठ मानेने उभा राहावा, यासाठी सरकार कटिबद्ध आहे, असा विश्वास राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री बबनराव लोणीकर यांनी व्यक्त केला. शनिवारी शहरातील हॉटेल गॅलक्सी गार्डनवर आयोजित नागरी सत्कारास उत्तर देताना लोणीकर बोलत होते. अध्यक्षस्थानी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे होते.

लोणीकर म्हणाले, शहर व ग्रामीण भागातील तरुणांना रोजगार मिळायला हवा. राज्यात नवीन उद्योग-व्यवसाय सुरू व्हावेत, यासाठी प्रयत्न केले जातील. देशात महाराष्ट्र वैभवशाली होऊन जगात भारत महासत्ता कसा होईल, यासाठी सर्वांचे प्रयत्न आवश्यक आहे. केंद्र व राज्य सरकार यासाठी प्रयत्नशील असून येथील प्रत्येक समाजघटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणून सर्वसमावेश विकास साधू, असे लोणीकर म्हणाले.

ड्रायपोर्टसाठी प्रयत्न
जालना व औंरगाबादरम्यान ड्रायपोर्ट मंजूर झाले असून ५०० एकर जागा उपलब्ध असल्याचा अहवाल शासनास दिलेला आहे. ड्रायपोर्ट सोबतच येथे शेतमाल ठेवण्यासाठी कोल्ड स्टोरेज उभारता येईल, काय याचा विचार करत आहोत. जिल्ह्यातील रस्ते, पाणी, वीज प्रश्न सोडवण्यासाठी केंद्राकडून निधी आणू, असे रावसाहेब दानवे म्हणाले.

जिल्ह्याचा विकास
शहरातील अंतर्गत जलवाहिनी, ड्रेनेज, स्व्च्छता, औद्योगिक प्रश्न यासाेबतच जिल्ह्यातील पाणीपुरवठा योजना, रस्ते, शिक्षण, आरोग्याचे प्रश्न मार्गी लावावेत, अशी अपेक्षा आमदार अर्जुन खोतकर, आमदार राजेश टोपे, माजी आमदार कैलास गोरंट्याल, भास्कर अंबेकर, उद्योजक किशोर अग्रवाल, घनश्याम गोयल यांनी व्यक्त केली.