आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कर्ज अन् दुष्काळी निधीसाठी महाराष्ट्र ग्रामीण बँकेसमोर शेतकऱ्यांनी मांडला ठिय्या

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - कर्ज आणि दुष्काळाचा निधी देण्यासाठी दिरंगाई करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बालानगर येथील शाखेवर परिसरातील १२ गावांतील शेतकऱ्यांनी शुक्रवारी मोर्चा काढून तब्बल दोन तास ठिय्या आंदोलन केले.
राज्य शासनाने दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना तत्काळ कर्ज देण्याचे निर्देश बँकांना दिलेले आहेत. शासनाच्या या निर्देशालाच बँकांकडून हरताळ फासला जात असल्याची बाब या शेतकऱ्यांच्या आंदोलनाने समोर आली आहे. बालानगर येथील महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांना कर्ज आणि दुष्काळाचा निधी देण्याचे टाळत आहे. तब्बल तीन महिन्यांनंतरदेखील ही बँक शेतकऱ्यांची अडवणूक करत अाहे. त्यामुळे या बँकेशी जोडलेल्या कासार, पाडळी, नानेगाव, पुसेगाव, पाचलगाव, वरुडी, खातगाव, तुपेवाडी, पारुंडी, दरेगाव, ढोणगाव, कापूसवाडी या बारा गावांतील संतप्त शेतकऱ्यांनी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या बालानगर शाखेवर संघटनेचे नेते जयाजी सूर्यवंशी यांच्या नेतृत्वात मोर्चा काढला. बालानगर बसस्थानकापासून हा मोर्चा काढण्यात आला.
बँकेवर मोर्चा धडकला असता बँकेचे अधिकारी बाहेर येत नसल्याने शेतकऱ्यांनी दोन तास ठिय्या आंदोलन केले. या वेळी शेतकरीविरोधी शासनाच्या धोरणाविरोधात घोषणा देत कर्ज वितरणाची मागणी रेटून धरली. दरम्यान, एमआयडीसी ठाण्याच्या पोलिसांनी मध्यस्थी
करत बँक शाखा व्यवस्थापक आर. एल. धनेश्वर यांना शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे समाधान करून परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सहकार्य करण्यास सांगितले, परंतु बँकेचे व्यवस्थापकांच्या गोलमाल उत्तराने शेतकऱ्यांचे समाधान न झाल्याने बँक विरोधातील घोषणा देणे सुरूच ठेवले. मात्र, अाश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. आंदोलनात बद्रीनाथ गोर्डे, शिवाजी घोडके, कृष्णा बोबडे, बबन घोंगडे, गणेश शेळके, दता गाडेकर, मोहन कालेकर आदी
सहभागी झाले होते. कर्ज देण्यास टाळाटाळ बँक शेतकऱ्याला कर्ज देण्याचे टाळत आहे. वेळोवेळी मागणी करूनही विविध अटींची पूर्तता केली. कर्ज वाटप तर सोडाच, परंतु ही बँक अडवणूक करत आहे. येथील अधिकारी शेतकऱ्याला दमदाटी करत कर्ज देत नाहीत. जे करायचे ते करा, असा दमच देत असल्याचे मत या वेळी आंदोलकांनी व्यक्त केले. असा उघडकीस आला प्रकार नाटवी शिवारातील जंगलात शेळ्यांना चारण्यासाठी गेलेल्या एक ग्रामस्थाला वृक्षतोड झाल्याचे आढळून आले. याची माहिती त्याने ग्रामस्थांना दिली. येथील वन समितीचे अध्यक्ष मोतीराम कालभिले यांनी ग्राम सुरक्षा दलाचे प्रमाेद कालभिले, कृष्णा दौड, समाधान कालभिले, उमेश कालभिले, अनिल काकडे यांना जंगलाकडे पाठवले. त्या वेळी जंगलातून एक ट्रॅक्टर तोडलेली लाकडे घेऊना जाताना दिसून आले.

कर्ज नाकारणाऱ्या बँकांसमोर करणार ठिय्या
शासनाने शेतकऱ्यांना वेळेत कर्ज देण्याच्या सूचना दिल्या आहेत, परंतु पैठण तालुक्यातील काही बँक शासनाच्या निर्देशाचे पालन करत नसल्याची बाब समोर येत आहे. ज्या बँका शेतकऱ्यांना कर्ज देण्याचे टाळतील त्या बँकासमोर आठ दिवसांत ठिय्या आंदोलन केले जाईल. शिवाय जिल्हाधिकारी कार्यालयावरही आंदोलन करण्यात येईल.
जयाजी सूर्यवंशी, शेतकरी नेते.
वरिष्ठांशी चर्चा करणार
बालानगरसह परिसरातील शेतकऱ्यांना दोन दिवसांत कर्ज देण्याविषयी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात येईल. त्यानंतर कर्ज देण्यासंदर्भातील निर्णय घेतला जाईल. आर. एल. धनेश्वर, व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक बालानगर