आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुष्काळाने पिचलेल्या शेतकर्‍यांची आर्थिक लूट

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पिशोर - तहसीलचे शुल्क भरा किंवा आम्हाला शंभर रुपये द्या, आम्ही तुमची नोंदणी दुष्काळाच्या यादीत करतो, असे म्हणत शेतकर्‍यांना वेठीस धरण्याचे काम पिशोर तलाठी सजाकडून सुरू आहे. या प्रकाराबाबत शेतक र्‍यांनी संताप व्यक्त केला.

कन्नड तालुक्यांत दुष्काळ जाहीर होण्याची शक्यता गृहित धरून महसूल विभागाच्या वतीने दुष्काळग्रस्त शेतकर्‍यांच्या बँक खात्यांची माहिती घेणे सुरू आहे. पिशोर तलाठी सजात बँक खाते क्रमांक नोंदणी करण्यासाठी तहसीलचे २५० रुपयांचे शुल्क भरा किंवा शंभर रुपये देऊन नोंदणी करा, असा तगादा तलाठी कार्यालयाकडून लावण्यात येत आहे. दुष्काळामुळे मेटाकुटीस आलेल्या शेतकर्‍यांना महसूल विभागाच्या आडमुठ्या धोरणाचा फटका बसत आहे. ज्या
शेतकर्‍यांनी पैसे देण्याची तयारी दाखवली, त्यांनाच कार्यालयात घेऊन कार्यालयाला बाहेरून कुलूप लावण्यात आले.या प्रकराचा शेतक र्‍यांनी निषेध नोंदवला कार्यालयाबाहेर ठिय्या दिला. दरम्यान, या प्रकराबाबत तलाठी, मंडळ अिधका र्‍यांनी आम्हाला या विषयी बोलण्याचा अधिकार नसून तहसीलकडे चौकशी करा असे सांगितले.

सरपंचांनीही टोचले होते कान
काहीदिवसांपूर्वी हा प्रकार सरपंच पुंडलिक डहाके यांच्या कानावर आला होता. त्यांनी त्या वेळी तलाठी कार्यालयातील कर्मचारी शेख हारुण यांची कानउघाडणी केली होती. कानउघाडणी करूनही सदरील प्रकार सुरू असल्याचे सरपंच पुंडलिक डहाके यांनी सांगितले.

आवाज देऊनही कार्यालय उघडले नाही
पैसेदेणार्‍या शेतकर्‍यांना तलाठी कार्यालयातील कर्मचा र्‍यांनी सजामध्ये घेऊन इतर शेतकर्‍यांना बाहेरच ताटकळत ठेवले बाहेरून कुलूप ठोकले. या वेळी ताटकळत बसलेल्या शेतक र्‍यांनी मोठ्याने आवाज देऊन कार्यालयाचे कुलूप उघडण्याची विनंती केली, परंतु कर्मचार्‍यांनी दुर्लक्ष केले.