आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कलम 370 हटवता येणार नाही, भारताने पाकिस्तानशी चर्चा करावी; फारूक अब्दुल्लांचे मत

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद/नांदेड- कलम 370 हटवता येणार नाही. डोकलाम प्रश्नावरून भारत-चीन समोरासमोर आले होते. अगदी युद्धासारखी परिस्थिती निर्माण झाली होती. तरीही ब्रिक्स सम्मेलनासाठी पंतप्रधान चीनला गेले. भारत-चीन यांची डोकलाम समस्येवर चर्चा झाली. अगदी हाच न्याय भारताने पाकिस्तानच्या बाबतीत लावायला हवा आणि चर्चा सुरू करायला हवी, असे मत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूक अब्दुल्ला यांनी व्यक्त केले आहे. 
 
या बाबीचीही करा चौकशी
ते नांदेड येथे पत्रकारांशी बोलत होते. अब्दुल्ला हे नांदेड येथे गुरुद्वारा दर्शनासाठी आले होते. काश्मीर आणि दिल्लीमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने टेरर फंडिंग संदर्भाने छापे मारले. यापूर्वीही काश्मिरात असे छापे टाकण्यात आले आहेत. माजी रॉ प्रमुखांनी त्यांच्या पुस्तकात भारत सरकार हे काश्मिरात काही फुटीरतावाद्यांना पैसा पुरवते असा उल्लेख केलेला आहे. त्याचीही चौकशी राष्ट्रीय तपास संस्थेने करून सत्यता जाहीर करावी अशी मागणी अब्दुल्ला यांनी केली.
 
कलम 370 नाही येणार हटवता 
कलम 370 बाबत अनेक जण सध्या चर्चा करतात पण तत्कालीन प्रधानमंत्री अटलबिहारी वाजपेयी यांनी तत्कालीन चीफ जस्टीस आणि अनेक दिग्गज वकिलांशी कलम 370 बाबत चर्चा केली होती. एक समितीही नेमण्यात आली होती. पण समितीने 15 पानी कलम 370 हटवता येणार नाही असा स्पष्ट अहवाल दिला.
 
पुढील स्लाईडवर पाहा फोटो आणि माहिती
बातम्या आणखी आहेत...