आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Father Committed Suicide On Sun Funeral Function In Jalna

जालन्यात मुलाच्या चितेवर पित्याची आत्महत्या

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

जालना - मुलाच्या चितेवर उडी घेऊन पित्याने आत्महत्या केल्याचा प्रकार परतूर तालुक्यातील सातोना येथे रविवारी सायंकाळी 7.30 वाजता घडला. यातील मुलगा सुखदेव मुरली आकात (32) याने रविवारी शेतीच्या वादातून विष प्राशन केले होते. त्याला उपचारासाठी प्रथम सेलू आरोग्य केंद्रात नेले. नंतर परभणी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते; परंतु उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर रविवारी सायंकाळी त्याच्यावर सातोना येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. तेथून घरी आल्यानंतर त्याचे वडील मुरली तुकाराम आकात (62) यांनी शौचास जातो म्हणून घराबाहेर जाऊन मुलाच्या चितेवर उडी घेऊन आत्महत्या केली. ग्रामस्थांनी याची माहिती परतूर पोलिसांना दिली. मात्र, सोमवारी रात्री उशिरापर्यंत याप्रकरणी पोलिसांत नोंद झालेली नव्हती.