आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पित्याने केला अकरावर्षीय मुलीचा खून, पत्नी नांदायला येत नसल्याचा राग

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई - सहा महिन्यांपासून पत्नी नांदण्यासाठी सासरी येत नसल्याने संतापलेल्या पतीने दारूच्या नशेत मुलीचा गळा आवळून खून केला. ही घटना अंबाजोगाई शहरातील महात्मा फुलेनगर झोपडपट्टी भागात शुक्रवारी रात्री घडली. निकिता हरिश्चंद्र बलाढे (११) असे मृत मुलीचे नाव आहे.
झोपडपट्टीत हरिश्चंद्र दामू बलाढे (३५) हा ऊसतोड कामगार राहतो. चौदा वर्षांपूर्वी त्याचा विवाह रमा बलाढे हिच्याशी झाला. बलाढे दांपत्याला दोन मुली व एक मुलगा आहे. हरिश्चंद्र दारूच्या आहारी गेल्याने रमा सहा महिन्यांपूर्वीच दोन मुलांसह माहेरी गेली होती. मोठी मुलगी निकिता, हरिश्चंद्र, आजोबा दामू बलाढे व आजी असे चौघे राहत होते. सहा महिने झाले तरी पत्नी नांदण्यासाठी येत नसल्याने शुक्रवारी रात्री हरिश्चंद्र दारूच्या नशेत घरी आला. रागाच्या भरात त्याने निकिताचा गमजाने गळा दाबून खून केला व घरातील गोधडीत तिचा मृतदेह गुंडाळून ठेवला. मृतदेह पोत्यात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा डाव होता, असे पोलिसांनी सांगितले.