आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पत्‍नी नांदायला तयार नाही तर पित्‍याने केली चिमुकलीची हत्‍या

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अंबाजोगाई (बीड) - सहा महिन्यांपासून पत्नी नांदण्यासाठी सासरी येत नसल्याने संतापलेल्या बापाने दारूच्या नशेत गमजाने मुलीचा गळा आवळून खून केल्याची घटना शहरातील महात्मा फुले नगर झोपडपट्टी भागात शुक्रवारी रात्री साडेनऊ वाजता घडली.निकि‍ता हरीश्चंद्र बलाढे (११) असे मृताचे नाव आहे.
शहरातील महात्मा फुले नगरातील झोपडपट्टीत हरीश्चंद्र दामूु बलाढे (३५) हा उसतोड कामगार राहतो. चौदा वर्षांपूर्वी त्याचा विवाह रमा बलाढे हिच्याशी झाला. विवाहानंतर बलाढे दांमत्याला दोन मुली व एक मुलगा अशी तीन अपत्ये झाली. हरीशचंद्र हा दारूच्या आहारी गेल्याने पत्नी रमा ही सहा महिन्यांपूर्वीच दोन मुलांना बरोबर घेवून माहेरी निघून गेली होती. मोठी मुलगी निकीता, वडील हरीशचंद्र व आजोबा दामू बलाढे व आजी असे चौघे राहत होते. सहा महिने झाले तरी पत्नी नांदण्यासाठी येत नसल्याने शुक्रवारी रात्री हरीश्चंद्र हा दारूच्या नशेत घरी आला. रागाच्या भरात त्याने मुलगी निकीता हीचा गमजाने गळा दाबून खून केला. खुनाचा प्रकार उघडकीस येवू नये म्हणून घरातील गोधडीत मुलीचा मृतदेह गुंडाळून ठेवला. ते प्रेत पोत्यात टाकून त्याची विल्हेवाट लावण्याचा त्याचा डाव होता, असे पोलिसांनी सांगितले.