आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Female Fetocide Case : Dr Munde Present In Court

स्त्री भ्रूणहत्या प्रकरणातील आरोपी डॉ. मुंडे न्यायालयात हजर

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बीड - परळीतील स्त्री भ्रूणहत्या प्रकरणातील आरोपी डॉ. सुदाम मुंडेविरोधात पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत समन्स बजावल्याने गुरुवारी नाशिक पोलिसांनी त्यास येथील मुख्य न्यायदंडाधिकारी एस. एस. साळवी यांच्यासमोर हजर केले. येत्या 13 रोजी मुंडेच्या जामीन अर्जावर सुनावणी होणार आहे.

रुग्णालयाने घनकच-याची व्यवस्थित विल्हेवाट न लावल्यामुळे औरंगाबादचे महाराष्‍ट्र प्रदूषण कंट्रोल बोर्डाचे विभागीय अधिकारी प्रवीण जोशी यांनी मुंडे हॉस्पिटलविरुद्ध पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत बीडच्या न्यायालयात 9 जुलै 2012 रोजी तक्रार दाखल केली होती. हॉस्पिटलचे सर्वेसर्वा सुदाम मुंडे यास आरोपी करण्यात आले होते. यासंदर्भात न्या. साळवी यांनी मुंडेस सात फेब्रुवारी रोजी न्यायालयात हजर करण्याबाबत समन्स बजावले होते.